Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तहसीलदाराचे ऑंटी कोरोना फोर्सला भेटी

देवणी तहसीलदाराचे ऑंटी कोरोना फोर्सला भेटी


देवणी:(प्रतिनिधी:विक्रम गायकवाड) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवणीचे तहसीलदार सुरेशजी घोळवे हे संपूर्ण देवणी तालुक्यात अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रशासकीय यंत्रणा राबवित आहेत.यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी उत्तम रित्या काम करताना पहावयास मिळत आहे.यामुळे देवणी तालुक्यात एकही कोरोना संक्रमणित असलेला किंवा संशयित व्यक्ती आढळून आलेला नाही.हीच एक उल्लेखनीय कामगिरी म्हणाव लागेल.सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत गावभेट असो वा आरोग्य विभाग आणि अँटी कोरोना सारख्या स्थापना केलेल्या फोर्सला भेट देत  मार्गदर्शन करत आहेत.यावेळी देवणी तालुक्यातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे समाधानही व्यक्त केले आहे. नागरिकांनी यापुढेही लॉकडाऊन संपेपर्यंत असच सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.देवणी तालुक्याला सुरेशजी घोळवे यांच्या रूपाने एक अभ्यासु आणि अनुभवी अधिकारी लाभला आहे.


Post a Comment

0 Comments