महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
लातूर:(प्रतिनिधी) महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी ८:०० वाजता वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी हे उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता या वर्षीचा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
0 Comments