Latest News

6/recent/ticker-posts

जाणून घ्या अटी-शर्ती; देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत

जाणून घ्या अटी-शर्ती; देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत



नवी दिल्ली: देशातील लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवला आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता ४ मे ते १७ मेपर्यंत लॉकडाऊन असेल गृहमंत्रालयाने याबाबतची घोषणा केली. येत्या तीन मेपर्यंत देशात लॉकडाऊन होता. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला.रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असतील आणि ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असेल.यापूर्वी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून पहिल्यांदा २५ मार्च ते १४ एप्रिल यादरम्यान पहिला लॉकडाऊन जाहीर केला होता, त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा घोषणा करत लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला होता. मग आज केंद्रीय गृहमंत्रालयाने पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला.
यापूर्वीचा लॉकडाऊन
२४ मार्च मध्यरात्रीपासून २५ मार्च ते १४ एप्रिल 
१५ एप्रिल ते ३ मे, ४ मे ते १७ मे
महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांची प्रतिक्रिया
लॉकडाऊनच्या मुदतवाढीवर बोलताना राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊनची मुदतवाढ अपेक्षित होती.माझ्यासह स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या संवादामध्ये वारंवार याची सूचक कल्पना दिली होती. कोरोनासाठी रेड झोन म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रामध्ये तशीही कोणतीही शिथिलता दिली जाणार नव्हती ते मत राज्याचंही होतं.केंद्राने देखील तेच सांगितलं आहे.ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्येच काही प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार आहे.
झोन निहाय्य जिल्ह्यांचे वर्गीकरण
रेड झोन: मुंबई,मुंबई उपनगर, ठाणे,पुणे,नागपूर,नाशिक,औरंगाबाद, सोलापूर,सातारा,पालघर,यवतमाळ,धुळे,अकोला आणि जळगाव
ऑरेंज झोन: रायगड, अहमदनगर, अमरावती,बुलढाणा,नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली,रत्नागिरी,जालना, नांदेड,चंद्रपूर,परभणी, सांगली, लातूर,भंडारा आणि बीड
ग्रीन झोन: उस्मानाबाद,वाशीम,सिंधुदुर्ग,गोंदिया,गडचीरोली आणि वर्धा.


Post a Comment

0 Comments