Latest News

6/recent/ticker-posts

रमाजान ईदसाठी चाकूरातील २२५ गरजू कुंटूबियांना शिरखुरमा आणि धान्य किटचे वाटप

रमाजान ईदसाठी चाकूरातील २२५ गरजू कुंटूबियांना शिरखुरमा आणि धान्य किटचे वाटप


नगरसेवक इलीयासभाई सय्यद व त्यांच्या मित्र परिवाराचा पुढाकार


चाकूर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) मुस्लीम बांधवांचा अत्यंत पवित्र असलेला रमजान ईदचा सण हा ऐन कोरोनाच्या संकटात आला असून या रमजान ईद निमित्त ज्यांचे हातावर पोट आहे अशा सव्वा दोनशे गरजू कुंटूबियांना शिरखुरमा आणि धान्य किटचे वाटप नगरसेवक इलीयास सय्यद आणि त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे .सध्या कोरोनाचे सावट जगभर पसरले असून देशातही कोरोनाने चांगलाच शिरकाव केला असून महाराष्ट्र राज्यात हाहाकार माजविला आहे. यामुळे देशभरात मागील जवळपास दोन महिन्यापासून लाॕकडाऊन सुरू आहे. बहुतांशी कामे बंद असल्याने अनेक मजूर , कामगार घरीच असून आहे त्यातच कुटुंबाची,उपजिवीका भागवित आहे. काम नाही म्हणून दाम नाही या विवेंचनेत अनेकजण पहावयास मिळत आहेत. अशा लोकांची अडचण लक्षात घेवून ज्या लोकांना मदतीची गरज आहे अशा गरीब व गरजू लोकांना ईद निमित्ताने चाकूर शहरातील काही युवकांनी एकत्र येवून शहरातील २२५ कुटुंबाला शिरखुरमा साहित्य व इतर अन्नधान्य साहित्याचे वाटप केले आहे.चाकूर शहरात नगरसेवक इलियासभाई सय्यद आणि त्यांचा मिञ परिवार यामध्ये प्रामुख्याने मौलाना उमरफारुख शेख,मौलाना मतिन गुळवे, तौफिक शेख, बाबा सय्यद आदीनी पुढाकार घेवून सामाजिक बांधिलकी जोपासत रहेमतनगर,इंदिरानगर,एकतानगर, वस्तीवाड,बरकत नगर, लिमरानगर, खडकपुरा,आर बी पाटील नगर,कुरेशी मोहल्ला,पेट मोहल्ला, कोतवाल मोहल्ला या भागातील लोकांना मदत केली आहे.मागील महिन्यातच नगर पंचायतीचे युवा नगरसेवक इलीयास सय्यद यांनी शहरात पाचशे मास्कचे मोफत वाटप केले असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments