धोका टळलेला नाही सवलतीचा दुरुपयोग होऊ देऊ नका
लातुर:(प्रतिनिधी) कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने दिनांक ४ मे २०२० पासून लॉक डाउन चा तिसरा टप्पा १७ मे २०२० पर्यंत लागू केला आहे.या कालावधीत ऑरेंज झोनमधील जिल्ह्यासाठी शासनाने ज्या सवलती लागू केलेल्या आहेत त्या सर्व सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी लातूर जिल्हा प्रशासनाने करावी. हे करीत असताना धोका अद्याप ठळलेला नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी काळजी घ्यावी, सर्व आस्थापना, उद्योग-व्यवसाय या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स चा वापर करणे बंधनकारक करावे,असे निर्देश शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालकमंत्री या नात्याने दिले आहेत.
१) उदगीर शहरात कोरोना चा प्रादुर्भाव इतरत्र होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी
२) लातूर महापालिकेने फिजिकल डिस्टेंस न पाळणारे दुकाने बंद करावीत
३) पोलीस विभागाने चेक पोस्टवर येणाऱ्या वाहनांची व त्यातील लोकांची सविस्तर माहिती सादर करावी
४) जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारासाठी लातूरहून स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था करावी या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला दिल्या आहेत
.आढावा बैठकीतस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, पोलिस उपाधिक्षक सचिन सांगळे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, जिल्हा उपनिबंधक समृध जाधव एमआयडीसीचे महेशकुमार मेघमाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 Comments