Latest News

6/recent/ticker-posts

नितीन(दादा) टकले यांच्या सहकार्यातून निरंतर अन्नसेवा

नितीन(दादा) टकले यांच्या सहकार्यातून निरंतर अन्नसेवा


पुणे:(शहर प्रतिनिधी:तानाजी मोहळकर) लॉकडाऊन च्या पहिल्या आठवड्यापासून गेल्या दीड महिन्यापासून निरंतर अन्नसेवा पुणे शहर परिसरात सुरू आहे.
नितीन दादा टकले आणि मित्रपरिवार
नंदिनी टकले नगर मित्र मंडळ
शिववंश प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
शिव शंभू मित्र मंडळ शेवाळवाडी
नितीन दादा टकले युवा मंच
नंदिनी चारीटेबल ट्रस्ट या वेगवेगळ्या बॅनर च्या खाली नितीन राम टकले व सहकारी मित्रपरिवार मार्फत फूड पॉकेट व काही गरीब कुटुंबांना महिनाभर पुरेल इतकी राशन देण्यात आले याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत मास्क आणि सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले.कोरोना महामारी आजाराने देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना कोणीही उपाशी झोपू नये हा संकल्प घेऊन नितीन(दादा) टकले व टीम कार्य करत आहे. अन्नसेवा सुरू असून, लॉकडाऊन-१ आणि २ काळात शक्य होईल तितक्या गरजवंत लोकांपर्यंत पोहोचून फूड पॉकेट वितरण करण्यात आले. शिवाय गरजू कुटुंबाना राशन किट उपलब्ध करून देण्यात आले.राशन किट मध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल पुडे, शेंगदाणे, साखर, चहापत्ती, पोहे, मीठ, मिरची, हळद आदी जीवनाश्यक वस्तूंचा समावेश होता या उपक्रमासाठी राजकुमार भंडारी, निकिता टकले, राजश्री टकले, संजना टकले,समीर पवळे,सचिन नरवडे,प्रकाश काळे,नागेश शिंदे,सोमनाथ माळी,प्रवीण शेवाळे,सचिन जाधव,राम जाधव, अनिकेत नीलाजकर,आकाश चोरमले,परवेज शेख,तबरेज शेख,सुरज कानडे ,दादा माळी, भया गवळी,राहुल सोनवणे,आदी उपस्थित राहून परिश्रम घेत आहे.


Post a Comment

0 Comments