जेष्ठ विधीज्ञ विक्रम हिप्परकर यांचे लातूरात निधन
लातूर:(प्रतिनिधी) येथील जिल्हा न्यायालयातील जेष्ठ वकील अॅड विक्रमजी हिप्परकर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय ७३ होते.
राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रात तसेच नामांकीत वकील म्हणून अॅड विक्रम हिप्परकर यांची ओळख होती.कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते असलेले अॅड विक्रमजी हिप्परकर याना लातूर येथील माऊली हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असताना हदय विकाराने त्यांचे निधन झाले.
त्यांच्यावर लातूर येथील पाखरसांगवी येथील शेतात ६ मे रोजी दुपारी १.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिवंगत अॅड विक्रम हिप्परकर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले,१ मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे.
"मराठी अस्मितेचा इशारा" परिवारा तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली
0 Comments