Latest News

6/recent/ticker-posts

लेख ----> हीच वेळ आहे भविष्याचा वेध घेण्याची....

हीच वेळ आहे भविष्याचा वेध घेण्याची...


करा अजून निसर्गाचं वाटोळं ! ज्या दिवसापासून हा 'कोरोना' जगभर पसरतोय त्या दिवसापासून माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे. हे दुनिया बुडण्याचं लक्षण तर नाही ना? विचार करायला लावणारी ही फार गंभीर गोष्ट आहे. निसर्गाने साथ सोडली कारण मानवाने त्याचा ऱ्हास केला. हीच वेळ आहे भविष्याचा अंदाज घेण्याची! नाहीतर करा अजून वाटोळं त्या बिचाऱ्या निसर्गाचं! कोरोना हा महामारी आजार मानवनिर्मित आहे यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. जागतिक तापमानवाढ, जागतिक दुष्काळ, त्सुनामी आणि आता नव्यानेच जागतिक कोरोना. कोरोना या आजाराने जगभर थैमान घातले आहे. मोठं मोठ्या राष्ट्रानीही यासमोर शरणागती पत्करली आहे. मानवाने मागील काही वर्षात निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी केली आहे त्याचेच हे परिणाम याबाबत माझे ठाम मत आहे. ईश्वरानेही आता स्वतःवर जबाबदारी न घेता एकांतात राहण्याचा जणू निर्णयच घेतलाय की काय? अशीच स्थिती जगभर आहे. मानवा, खरंच तुझं तुझ्या या परिस्थितीला स्वतः जबाबदार आहेस आता तरी आत्मचिंतन कर! नाहीतर आजपेक्षा उद्या अजून भयंकर असेल यात वादच नाही.निसर्ग तर बिचारा कुठवर सहन करेल. त्याचीही सहनशीलता संपत चालली आहे कारणं तोही तुमच्या-आमच्या सारखा सजीवच आहे की. निसर्गाने जेवढं सहन केलं त्याच्या पटीत आपली सहनशीलता किती आहे हे मागील काही दिवसांत स्पष्ट झालेच आहे. साधं आपण लॉक डाऊन काळात घरात स्वस्थ बसू शकत नाही हीच का आपली सहनशीलता? पेरले ते उगवणारच आणि निसर्गाच्या हानीचे हे पाप आहे तो भोगावेच लागणार आहेत.एकेकाळी किती तंदुरुस्त माणसं होती. निसर्गाची सेवा करणारी ती माणसं. लबाडीला जवळ न येऊ देणारी ती माणसं. एकमेकांना सहकार्य करणारी ती माणसं. त्या काळातही साथीचे आजार होते पण विज्ञान इतकं प्रगत नसल्याने त्याचा फटकाही त्यांना यदाकदाचित बसलाही असेल त्याबद्दल दुमत नाही. पण, आज सर्व क्षेत्रात जग पुढे जात आहे. मग कोरोना वर मात का नाही? कोरोना सारखे भयंकर आजार झपाट्याने पसरत असताना माणूस पूर्णपणे हतबल झाला आहे. बाबांनो, अजूनही वेळ गेली नाही जागे व्हा. आजचा सोडा उद्याचा तरी विचार करा. निसर्गाच्या मदतीसाठी एक हात पुढे करा, निसर्ग 99 पावले पुढे यायला तयार आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील नातं आणखी मजबूत करण्याची ही वेळ आहे. निसर्ग सदृढ असेल तर कोरोना सारखे कितीही भयंकर आजार येऊ द्या त्या सर्वांवर मात करण्याची ताकद निसर्गात आहे. सर्वांनीच निसर्गाचे संवर्धन केलेच पाहिजे. फुकट ऑक्सिजन घेता ना मग लावा एक झाड आणि त्याला जपा. फुलू द्या निसर्गाला म्हणजे आपलाही श्वास गुदमरणार नाही.


हात जोडतो मित्रांनो, निसर्गाला जपा तोच आपला रक्षणकर्ता आहे. 


प्रा.योगेश शर्मा(अध्यक्ष)


वसुंधरा प्रतिष्ठान,लातूर
भ्रमणध्वनी: 9850028711


Post a Comment

0 Comments