Latest News

6/recent/ticker-posts

निटूर येथील रेशन कार्ड धारकांना सूचना

निटूर येथील रेशन कार्ड धारकांना सूचना


निटूर:(प्रतिनिधी) निटूर ता.निलंगा येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत असताना ग्रामस्थांनी आपल्या गावातील राशन वाटपात होत असलेला काळा बाजार थांबवण्याची मोहीम आपण राबवत आहोत,अनेकांची नावे येऊनही तुमचे राशन अजून आलं नाही,म्हणून कमी राशन देणे, २ रु किलो गहू व ३ किलो तांदूळ असताना प्रत्येकाकडून जास्त पैसे घेणे,पावती न देणे हे सरार्स सुरू आहे.आपल्या हक्काचे अन्न कोणी चोरत असेल तर आपण गप्प बसू नये ते मिळवणं सर्वांचा हक्क आहे.मे २०२० या महिन्यात सर्वांना १००%राशन पावती सह मिळाव्या या सूचना सर्व राशन दुकानदार ला दिल्या आहेत जरी कुणाला मिळालं नाही तर ग्रामपंचायत कडे अर्ज करा.आपल्याला किती राशन मंजूर आहे ते पहायचं असेल तर आपल्या मोबाईलमध्ये
http://www.mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp 
या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड  नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे हे आपल्याला कळेल. तक्रार किंवा अडचणी करिता सरपंच,निटूर यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान सोशल मीडियाद्वारे करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments