Latest News

6/recent/ticker-posts

अडचणीत असलेल्या नाट्य, चित्रपट कलाकारांना आर्थिक मदत

अडचणीत असलेल्या नाट्य, चित्रपट कलाकारांना आर्थिक मदत



मुंबई:(प्रतिनिधी) दि. २७ - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू असून सर्व व्यवहार ठप्प झालेआहेत. चित्रपट, नाट्य व्यवसायावर ही त्याचा मोठा परिणाम झाला असून कलाकार आणि रंगमंच कर्मांचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा दोनशेहून अधिक कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी श्री अरविंदो मीरा ही संस्था पुढे आली आहे.लॉकडाऊन काळात चित्रपट आणि नाट्यगृह बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे अनेक कलाकार,रंगमंच कामगार बेरोजगार झाले आहेत. तंत्रज्ञान, रंगभूषा, वेशभूषा करणारे तसेच नेपथ्यकार, तिकीट तपासनीस, बॅनर लावणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी श्री.अरविंदो मीरा ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने नाट्य,चित्रपट क्षेत्रातील दोनशे कलाकार आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून त्यापैकी काही जणांना आर्थिक मदत केली आहे तर इतर कलाकार, कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मदत करण्यात येणार असल्याचे श्री अरविंदो मीरा संस्थेच्या अध्यक्षा तसेच चित्रपट नाट्य, अभिनेत्री नयन पवार यांनी सांगितले. ही संस्था दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवत असते. आतापर्यंत अनेक गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक, वैद्यकीय, मोफत शिक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. नवी मुंबईत संस्थेमार्फत अनेक मुलांना मोफत नृत्य शिक्षणही दिले जाते. संस्थेने आतापर्यंत अनेक मराठी नाटकांची निर्मिती केली असून त्यात मार्ग युद्धाचा कि बुद्धाचा, पहिली भेट, आई ग कुछ कुछ होता है तर चिंगीचे प्रश्न, अंधारातून प्रकाशाकडे या लघुपटाची निर्मिती केली आहे. नयन पवार यांची कन्या लावण्या पवार हिने वयाच्या सोळाव्या वर्षी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.ती एक चांगली नृत्यदिग्दर्शिका असून तिने भरतनाट्यम मध्ये विशारद घेतली आहे. सामाजिक उपक्रमात तिचाही सहभाग असतो.


Post a Comment

0 Comments