Latest News

6/recent/ticker-posts

विद्यार्थांसाठी मस्ती की गृहशाला-अपनी तो पाठशाला हा उपक्रम सुरू

विद्यार्थांसाठी मस्ती की गृहशाला-अपनी तो पाठशाला हा उपक्रम सुरू


भंडारा:(प्रतिनिधी) मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व महाराष्ट्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी तालुक्यात २७ गावातील ३१ शाळेमध्ये वर्ग ६ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांना खेळाच्या  माध्यमातून जीवन कौशल्य  शिकविल्या जाते .पण आता भारतात करोना या विषाणूने  धुमाकूळ घातला आहे म्हणून सर्वत्र लॉकडाऊन लागला असल्याने  सर्व शाळा बंद आहेत. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेने गावात हा विषाणू पसरू नये म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांना  करोना बद्दल माहिती दिली कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टी टाळायची आहे याबद्दल माहिती देण्यात आली आणि विद्यार्थांसाठी मस्ती की गृहशाला-अपनी तो पाठशाला हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे .
या Lockdown काळात विद्यार्थी व्यस्त राहतील, मुलांना काहितरी आनंददायी उपक्रम करायला मिळतील व त्यातुन त्यांना काहीतरी शिकायला मिळेल या उद्देशाने SCALE APPI या  प्रकल्पाच्या वतीने खास इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी  मस्ती की गृहशाला - अपनी तो पाठशाला हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उपक्रम ३० दिवसांचा असून ३० उपक्रम होणार आहेत. रोज एक उपक्रम Whatsapp Group वर पाठविला जातो आणि तयार केलेल्या उपक्रमाचा फोटो काढून विद्यार्थी त्यांचे संबंधीत मॅजिक बस चे सहाय्यक यांना Whatsapp द्वारे रोज सायंकाळ पर्यंत पाठवतील व यांचा संग्रह Hard Copy स्वतःजवळ संग्रह करून ठेवतील. सहभागी विद्यार्थ्यांना एकुण तिसही उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे Whatsapp नाही त्यांना कॉल किंवा SMS च्या माध्यमातून सांगितल्या जात आहे. या शिबिरामध्ये एकूण १६५०1 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी त्यांच्या उपक्रमाच्या सर्व संग्रहित Hard Copy व Project आपले वर्गशिक्षक किंवा मॅजिक बस स्टाफ यांच्या कडे जमा करतील. जे विद्यार्थी संपूर्ण ३० उपक्रमात सहभागी होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत SCALE APPI या प्रकल्पाच्या वतीने मुख्याध्यापक, सरपंच, आणि SMC यांचे हस्ते उत्स्फूर्त पारितोषिक देण्यात येणार आहे. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे जिल्हा प्रमुख निक्की प्रेमानंद (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी) यांच्या मार्गदर्शनात कु. प्रियंका रागीट, विवेक मलोडे मॅजिक बस स्टाफ व लाखनी तालुक्यातील गाव सहाय्यक प्रतिनिधी हे सर्व ही मोहीम पार पाडत आहेत.


Post a Comment

0 Comments