Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे स्वस्त धान्य दुकानातून मोफत पाच किलो तांदूळ चे वाटप

नळेगाव येथे स्वस्त धान्य दुकानातून मोफत पाच किलो तांदूळ चे वाटप


नळेगावं:(प्रतिनिधी) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत नळेगावं येथे प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ सरपंच अनुसया भालेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेत शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवली असून या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचे काम दुकानदारा मार्फत सुरू आहे. येथील सी.सी. तांदळे यांच्या स्वस्त धान्य दुकानातून प्रधान्य गटातील ३,१८५ कार्डधारक व्यक्ती व अंत्योदय कार्डधारक ३३१ व्यक्ती अशा एकूण ३,५१६ लोकांना प्रतिव्यक्ती पाच किलो प्रमाणे फिजिकल डिस्टन्स नियम पाळून तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अनुसया भालेकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर तांदळे, तलाठी अविनाश पवार, ग्रामसेवक अमित रोकडे, अण्णासाहेब पाटील, रंगनाथ भालेकर, सादिक पटवेकर आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments