Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यातील ५८ परप्रांतीयांना परतीचे पास निर्गमित

औसा तालुक्यातील ५८ परप्रांतीयांना परतीचे पास निर्गमित


औसा:(प्रतिनिधी /सय्यद नदिम) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ५४ दिवसाचे लॉकडाऊन १७ मे पर्यंत लागू झाले असून तीन टप्प्यात लाॅकडाऊन झालेले आहे. औसा शहर व तालुक्यात अनेक परप्रांतीय लोक उपजीविकेसाठी आलेले आहेत. कोरोना विषाणूंमुळे हे लोक तालुक्यात अडकले असल्याने त्यांनी त्यांच्या गावी परत जाण्याची विनंती प्रशासनाला केली असल्याने आज पर्यंत ५८ परप्रांतीयांना त्यांच्या मुळगावी परतण्यासाठी महसूल प्रशासनाने पासेस निर्गमित केले आहेत. यामध्ये तामिळनाडू - ३, उत्तर प्रदेश - १५, तेलंगाना - १५, मध्यप्रदेश - ११, कर्नाटक - २, आणि छत्तीसगड राज्यातील - १३ अशा एकूण ५८ नागरिकांचा समावेश आहे. मोलमजुरी करून उपजीविकेसाठी आलेल्या परप्रांतीयांना कोरोना विषाणूंमुळे लागू झालेल्या लाॅकडाऊन काळात त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून एकूण ५८ नागरिकांना परप्रांतात प्रवास करण्यासाठी औसा येथून पासेस दिले असल्याची माहिती तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख शोभा पुजारी व नायब तहसीलदार शिवाजी कदम यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments