Latest News

6/recent/ticker-posts

बारड येथे पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला

बारड येथे पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला
 
मुदखेड:(पिराजी एल गाडेकर) तालुक्यातील बारड या गावी रविवारी १०  तारखेला तिघाचे स्व्याब घेतले होते त्या पैकी एक बाविस वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून बारड व बारड परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.त्यामुळे महसूल व ग्रामपंचायत बारडच्या वतीने दोन दिवस जनता कर्फ्यू चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बारडचे  ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव यांनी दिली आहे. यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले सा.पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे व उपसहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त दिला जात आहे. आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनावर लोकांवर यांची नजर ठेवून सखोल चौकशी केली जात आहे.हळूहळू ग्रामीण भागामध्ये कोरोना आपला अधिकार अजमावत याची अनेक ग्रामीण भागातील लोकांना मोठी चिंता लागलेली आहे.ग्रामीण भागातून कोरोना पॉझिटीव्ह आलेला हा दुसरा रुग्ण आहे. याअगोदर माहूरला देखील सापडला होता.
मुंबईमधील चिघळत चालेली परिस्थिती पाहून एका कुटुंबातील तरूण मुंबई येथून पायी आपल्या गावाकडे निघाला होता. मंठा येथून वाहन मिळाल्यानंतर सर्व जण बारड येथे दोन दिवसांपूर्वी पोहचले. मात्र गावकर्‍यांनी सदरची माहिती पोलिसांसह आरोग्य प्रशासनाला दिली. यावरून त्यास कुटुंबास गावातील धर्मशाळेत क्वॉरंटाईन करून स्वॅब घेण्यात आले होते.यामध्ये २२ वर्षीय तरूणाचा अहवाल मंगळवार दि.१२मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.या युवकाच्या संपर्क मध्ये आलेल्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले गावाचां संपूर्ण परिसर तिसर्‍यांदा निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे गावातील बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर ग्रामपंचायतच्या आदेशानुसार प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जात आहे आणि त्यांची प्राथमिक तपासणी केल्या जात आहे त्यांना लक्षणे आढळून आल्यास त्यांची रवानगी ही ग्रामीण रुग्णालय मध्ये केले जात आहे व साधारण असल्यास स्वतःच्या घरातच विलगीकरण करण्यात आले गावातील सर्व परिस्थितीवर गावचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत सरपंच प्रतिनिधी विलासराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य तलाठी बार्शीकर मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी अमोल दांडेकर,संदीप पानबुडे इत्यादी आणि अशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी गावात आलेल्या नवीन लोकांची यादी ग्रामपंचायत व प्रशासनाकडे देऊन संबंधित अधिकाऱ्यांना कळवत आहेत.आता नांदेड जिल्ह्यातील बाधिता त्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.
आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या हद्दीत होती. परंतु चार दिवसांपूर्वी माहूर येथील एक  इसम कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यानंतर मंगळवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे एक जण कोरोनाग्रस्त निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments