केशरी कार्डधारकासाठीही धान्यवाटप सुरू- पालकमंत्री
लातूर जिल्हयातिल स्वस्त धान्य दुकानातून ६१५९ टन गहू, ३९६९ टन तांदूळ वाटप जिल्हयात २२ लाख ७६ हजार ८६७ लाभार्थी
लातूर:(प्रतिनिधी) कोविड-१९ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर एकही व्यक्ति उपाशीपोटी राहू नये यांची महाराष्ट्र शासन काळजी घेत आहे. या संदर्भाने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हयातील एकुण परिस्थितीचा आढावा घेतला असून एप्रिल २०२० या एका महिन्यात जिल्हयातील ३ लाख ९८ हजार ४२५ शिधा पत्रकधारकांना, ६ हजार १५९ मे.टन गहू व ३ हजार ९६९ मे. टन तांदळाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय एकुण ४५ हजार २०७ केशरी कार्डधारकांसाठी२४ एप्रिल पासून नियतन वाटप करण्यात येतअसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या संदर्भाने बोलतांना पालकमंत्री ना. देशमुख यांनी सांगितले की, कोविड-१९ च्या पार्श्वभुमिवर राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोविड-१९ ची तपासणी करून संबंधित रूग्णावर उपचार करण्याचे काम राज्यात युध्द पातळीवर सरू आहे. या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे अनेक उदयोग, व्यवसाय, बांधकामे बंद पडली आहेत. परिणामी गरिब जनतेचा रोजी, रोटीचा प्रश्न निर्माण होणार होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन पूरवठा विभागामार्फत सर्वसामान्य जनतेला आन्नधान्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची काटेकोर अमंलबंजावणी होत असून स्वस्तधान्य दुकानातून हे धान्य वितरीत करण्यात येत आहे.लातूर जिल्हयात पुरवठा विभागामार्फत होत असलेल्या धान्यवितरण प्रक्रीयेचा नुकताच आढावा धेतला आहे. लातूर जिल्हयात एकुण अंत्योदय शिधापत्रीकाधारकांची संख्या ४१ हजार ९३७ असून त्या कुटूंबातील एकूण सदस्य संख्या २ लाख २१ हजार ४३८ एवढी आहे. प्राधान्य कुटूंब लाभार्थी शिधापत्रिका लाभार्थी संख्या ३ लाख २ हजार ९०० आहे या कुटूंबातील सदस्य संख्या १५ लाख २१ हजार ४३ एवढी आहे. एपीएल शेतकरी शिधा पत्रिकाधारकांची संख्या ६१ हजार ३२१ असून या कुटूंबातील एकूण सदस्य संख्या ३ लाख १५ हजार ८०८ एवढी आहे. एकुण शिधा पत्रकधारकांची संख्या ४ लाख ६ हजार १५८ असून यापैकी ३ लाख ९८ ४२५ हजार शिधापत्रकाधारकांना एप्रिल महिन्यात ६ हजार १५९ .९ टन गहू व ३ हजार ९६९ .८ टन तांदूळ वितरीत करण्यात आला आहे. एकदंरीत ९८.१ टक्के शिधापत्रकधारकांनी धान्य वाटपाचा लाभ घेतला आहे.
पंतप्रधान गरिब कल्याण योजनेतून ८ हजार १८० टन तांदूळ वितरीत
पंतप्रधान गरिब कल्याण योजनेतून एप्रिल महिन्यात अत्योदयचे ३९ हजार ९५०, प्राधान्य कुटूबांचे २ लाख ८१ हजार ७१६ अशा एकुण ३ लाख २१ हजार ६६६ कार्डधारकांना ८ हजार १८०.२ टन मोफतचा तांदूळ (प्रति व्यक्ति ५ किलो प्रमाणे) वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली आहे.एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या ४५ हजार २०७ असून त्यात प्रतिव्यक्ति ८ रू दराने ३ किलो गहू व १२ रूपये किलो या दराने २ किलो तांदूळ वाटप ऑफलाईन पध्दतीने होणार आहे. २४ एप्रिल पासून मे महिन्याच्या नियतनाच्या वाटपास सुरूवात करण्यात आलेली आहे. मे च्या पहिल्या आठवडयात या सर्व शिधापत्रकधारकांना धान्य मिळणार आहे असे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
जिल्हयात २२ लाख ७६ हजार ८६७ लाभार्थी
एकंदरीत जिल्हयात अत्योदय, प्राधान्य कुटूंब, एपीएल शेतकरी कुटूंब आणि एपीएल केशरी शिधा पत्रिकाधारक यांची एकुण संख्या ४ लाख ५१ हजार असून या सर्व कुटूंबात २२ लाख ७६ हजार ८६७ सदस्य आहेत. या सर्वांना शासनामार्फत धान्य पूरवठा होत आहे असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
0 Comments