राष्ट्रवादीकडून डॉक्टरसाठी फेस शिल्डचे वाटप
चाकूर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) रुग्ण तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना कसलीही अडचण येवू नये यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने डॉक्टरसाठी फेस शिल्ड देण्यात आले.अहमदपूर चाकूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेनूसार राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट,राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्यावतीने हे फेस शिल्ड देण्यात आले आहेत.चाकूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक लांडे यांच्याकडे डॉक्टरांसाठी फेस शिल्ड देण्यात आले.याप्रसंगी माजी सभापती करीमसाहेब गुळवे,माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, शहराध्यक्ष गणेश फुलारी, अनिल वाडकर, पत्रकार मधुकर कांबळे,कोंडीबा पडोळे, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments