बाभळगांव येथे दोन बिबटयांचा वावर;वनविभागाकडून शोधमोहिम सुरू
पंचक्रोशीतील शेतकरी,नागरिक यांनी घरातच रहावे महिला व लहानमुलांची अधिक काळजी घ्यावी अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
लातूर:(प्रतिनिधी) बाभळगाव येथील देशमुख कुटूंबियांच्या शेतात दोन बिबटे आढळले आहेत. या परिसरात त्यांचा वावर रविवार ३ मे रोजी सकाळी दिसून आला आहे. त्यानंतर बाभळगाव व पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक यांना सतर्क करण्यात आले आहे. या संदर्भात वनविभागास कळविण्यात आले असून त्यांनी बिबटयांना पकडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. बिबटयांना पकडे पर्यंत परीसरातील महिला, लहानमुले यांनी घरातच रहावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
बाभळगांव येथील देशमुख कुटूंबियांच्या शेतात दोन बिबटे असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाचे वन अधिकरी पोतलवार यांना तातडीने सुचना देण्यात आल्या आहेत. माहीती मिळताच वनअधिकारी पोतलवार आणि त्यांचे सहकारी बाभळगाव येथे पोहचले असून वनविभागाने बिबटयांना पकडण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली आहे. एक बिबटा पळून गेला आहे तर एक ऊसात लपला आहे त्यांना पकडण्याचे काम सुरू आहे, या बिबटयांना पकडे पर्यंत पंचक्रोशील शेतकरी, नागरिक, महिला आणि लहान मुलांनी शेतात व परीसरात वावरतांना स्वताची काळजी घ्यावी. या दोन बिबटयांना परत वनात सोडल्यानंतर सर्वांना कळविण्यात येईल असेही अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
0 Comments