लातूरचा स्वरूप नागापुरे राज्यस्तरीय बाल वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
लातूर:(प्रतिनिधी) महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनकल्याण महाप्रकल्प द्वारा ऑनलाईन राज्यस्तरीय बाल वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.लॉकडाऊन च्या काळात लहान विद्यार्थ्यांना घरबसल्या वक्तृत्वाचे व्यासपीठ निर्माण करून देणे व त्यांचे विचार हे सोशल मीडिया च्या माध्यमातून इतरत्र पसरवणे ह्या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. चिमुकल्या स्पर्धकाने सात मिनिटपर्यंत न थांबता भाषण केले आहे हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले आहे. या स्पर्धेमध्ये लातूरचा स्वरूप शिवलिंग नागापुरे,श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर,लातुर चा इयत्ता तिसरी चा हा विद्यार्थी प्रथम, रायगडची कु.स्वराज्ञा चंद्रकांत इंद्राक्षे ही अवघ्या ४ वर्ष ७ द्वितीय ,तर शिरूर अनंतपाळ ची कु.अदिती महालिंग चाकोते ही जि. प.प्रा.शाळा,भोजराज नगर,शिरूर अनंतपाळ ची इयत्ता दुसरी ची विद्यार्थिनी तृतीय येण्याची मानकरी ठरली आहे.विजयी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व ज्यांनी या स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत अशा सर्व स्पर्धकांच सुध्दा विशेष अभिनंदन. ही स्पर्धा पुढल्या वर्षी सुद्धा अशीच सुरू राहणार आहे.सर्व विजयी बक्षीस वितरण हे लॉकडाऊन नंतर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व्यवस्थित झाल्यानंतर होणार आहे.
0 Comments