कोरेनाच्या महामारीत शहरी भागात पूर्णपणे सामाजिक बांधिलकी जोपासत डाॅ.एन.जी.मिर्झा देत आहेत रुग्णसेवा
चाकुर:(ता.प्रतिनिधी:सलीमभाई तांबोळी) सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात
कोरोना या महाभयंकर महामारिने थैमान घातले असून गेली महिनाभरापासून देशासह संपूर्ण राज्यात लॉक डाऊन चालू आहे.
जगात सगळीकडे कोरेणा विषाणु प्रभावाने महामारी माजली असून ह्या विषाणु मुळे देशासह संपूर्ण राज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यामुळे विविध विभागातून मिळणार्या भारताला हजारो करोड च्या महसुलाकडे न बघता प्रत्येक भारतीयांची प्राणाची रक्षा करण्यासाठी भारताचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदी ची घोषणा करत नागरिकांनी घरातच राहून कोरो ना महामारिवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते तर आरोग्य विभाग पोलिस प्रशासन यंत्रणा,महसुल विभाग ने दिवसराञ मेहनत घेत कोरेना विषाणु ला संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना म्हणून सर्वतोपरी काम करत आहेत.चाकुर शहरातील मिर्झा हॉस्पिटल नावांने त्यांचा दवाखाना आहे.समाज सेवेची त्यांना आवड आहे.रोटरी क्लब चाकुरचे ते अध्यक्ष होते.त्याच्या कार्यकाळात रोटरीला अनेक पारितोषिक मिळाले.त्यांची एक मुलगी ही सध्या वैद्यकीय सेवा देते आहे.गोर गरीब पेंशन्टला आपुलकी ने विचारुन तपासणी करुन योग्य उपचार करण्यात ते माहीर आहेत.कोरोना विषाणु च्या लागणीमुळे अनेक डॉक्टर,पोलीस अधिकारी कर्मचारी,सामाजिक
कार्यकर्त्यांना या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे अनेक खाजगी डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद केले असल्याचे दिसते तर काहींनी दुरूनच रुग्णाला विचारपूस करून उपचार करण्याची पद्धत अवलंबली असून माञ चाकुर तालुक्यातील
येथील डॉ.एन.जी.मिर्झा यांनी चाकुर शहरातील भागात त्यांचा दवाखाना असून तेथेच त्यांनी सेवा देण्याचे काम चालू ठेवले असून त्या भागातील आजूबाजूच्या जवळ जवळपास चाकुर तालुक्याच्या ग्रामीण भागातुन अनेक लोक त्याच्या कडे तपासणीसाठी येतात.चाकुर परिसरातील जनतेचे मोठे हाल होत होते.पण अशा संकट कालीन परिस्थितीत डॉ.एन.जी.मिर्झा यांच्या अविरत रुग्णसेवा व प्रामाणिकपणामुळे आम्हा चाकुर वासियांना गर्व होण्यासारखी बाब आहे अशी भावना गावकऱ्यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" चाकुर तालुका प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केल्या.डॉ.एन.जी.मिर्झा यांनी कोरोना विषाणू मुळे देशावरील संकटा समयी चाकुर व परिसरातील जनतेला ताप,डोक दुखी,सर्दी खोकला, सारख्या छोट्या मोठ्या आजारावर सेवा देत असल्याने त्यांच्या कार्याचा परिसरातील जनतेतून कौतुकाचा वर्षाव होत असून व तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील,विलासराव पाटील,करीमसाब गुळवे,सय्यद मुर्तुजाअली, बालाजी पाटील चाकुरकर,सुरेशदादा हाके पाटील,इलीयास सय्यद नगरसेवक चाकुर,गणेश फुलारी,प्रशांत बिबराळे, शेख हुसेन,शेख इलीयास सर,प्रा.इसा बेग,सुदर्शन स्वामी,मान्यवरांच्या वतीने कौतुक व आभार प्रगट करण्यात आले.
0 Comments