Latest News

6/recent/ticker-posts

लातुरात पर्यावरण दिनी 'वसुंधरा ट्री बँके'ची स्थापना

लातुरात पर्यावरण दिनी 'वसुंधरा ट्री बँके'ची स्थापना


'एक मित्र: एक वृक्ष'उपक्रम अंतर्गत एकाच दिवशी १००० झाडांची जिल्ह्यात लागवड


लातूर:(प्रतिनिधी) येथील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गत सहा वर्षांपासून वृक्ष लागवड आणि संगोपन चळवळ उभी करण्यात आली असून आता या चळवळीला जन चळवळीचे रूप आले आहे. दरम्यान, 'एक मित्र:एक वृक्ष' या अभियान अंतर्गत आज लातूर जिल्ह्यात सुमारे १००० झाडांची लागवड करण्यात आली. महिलांच्या हस्ते ठिकठिकाणी वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.आजवर वसुंधरा प्रतिष्ठानने नानाविध प्रकारचे उपक्रम राबवून हजारो झाडे लावली आणि जगविली आहेत. जिल्हाभर वृक्ष लागवड आणि संगोपनाची चळवळ उभी करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनी लातुरात ट्री बँक स्थापन करण्यात आली असून यात अनेक जण वृक्ष ठेव करत आहेत. यावेळी adv. वैशाली लोंढे, भाग्यश्री नेलवाडे, तेजश्री बावळे, सौ.बावळे, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कायदेविषयक सल्लागार Adv. अजित चिखलीकर, जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक, सचिव रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य अभिजीत स्वामी उपस्थित होते.दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वसुंधरा प्रतिष्ठानने 'एक मित्र:एक वृक्ष' हे अभियान सुरू केले असून या अंतर्गत एकाच दिवशी १००० झाडांची लागवड जिल्हाभरात करण्यात आली. शिवाय, गतवर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त शहरात महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली.


Post a Comment

0 Comments