लातूर जिल्ह्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह तर कोरोनाचा आणखी एक बळी
लातुर ६६ पैकी ६० निगेटीव्ह तर ६ पॉझिटिव्ह
पाटोदा ता. अहमदपूर येथील एका व्यक्तीचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण ६२, उपचाराने बरे झालेले रुग्ण ७७ व मृत्यू झालेले रुग्ण ४
लातूर:(प्रतिनिधी) दि.३
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक ३ जुन २०२० रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण ६६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २२ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी १८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून ४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी २ व्यक्ती रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील असुन त्या ७ दिवसांपूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत. तसेच १ व्यक्ती औसा तालुक्यातील हिप्परगा येथील असून त्यांनी मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे व १ व्यक्ती कादरी नगर औसा येथील असून ती व्यक्ती सोलापूर येथून प्रवास करून आलेली आहे.कोविड केअर सेंटर लातूर येथून ३७ व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते त्यापैकी ३५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही व्यक्ती संभाजी नगर लातूर येथील रहिवाशी आहेत.अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील १ व्यक्ती मागिल ११ दिवसापासून या रुग्णालयात उपचार घेत होती त्या व्यक्तीला पूर्वीपासूनच ह्रदयाचा आजार होता व त्याचा कोरोना (कोविड-१९) मुळे मृत्यू झाला आहे.उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण ३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच ३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.निलंगा १, चाकूर २, देवणी १ असे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.याप्रकारे लातूर जिल्ह्यातून एकूण ६६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
0 Comments