कोरोनावर मात करून आलेल्या एमआयएम माजी शहराध्यक्ष शेख अफसर यांचे शहरात जंगी स्वागत
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी. शेख)दि. ३० शहरातील एम आय एम माजी शहराध्यक्ष शेख अफसर यानी कोरोना आजारावर मात करून आल्यानंतर त्यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.
जनतेच्या सेवेसाठी सतत तत्पर असलेले व लॉक डाऊन च्या काळामध्ये सर्वसामान्यांचे काम करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना कोरोना आजाराने केव्हा ग्रासले हे त्यांनादेखील कळाले नाही .सर्दी, खोकला, व ताप यांचा त्रास जाणवल्याने त्यांनी स्वतः कोरोणा टेस्ट केली होती.त्या टेस्टमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता ज्यावेळेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यावेळी त्यांनी स्वतःला खचू न देता खंबीरपणे या रोगावर मात केली. शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचार घेऊन परतल्यानंतर शहरांमध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता मात्र सोशल डिस्टंसिंग चे पालन करून त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्लाजमा डोनेट करणार असल्याचे इशाराच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
0 Comments