Latest News

6/recent/ticker-posts

आई वडील नाहीत म्हणून ती खचली नाही; आजी आजोबांकडे राहून वैष्णवी पोटेचे शालांत प्रमाणपत्र परिक्षेत नेत्रदीपक यश

आई वडील नाहीत म्हणून ती खचली नाही; आजी आजोबांकडे राहून वैष्णवी पोटेचे शालांत प्रमाणपत्र परिक्षेत नेत्रदीपक यश



९८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण,जगत् जागृती विद्या मंदिरातून केले यश संपादन


चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी] बाल वयातच आई वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे मावश्या व आजी आजोबांनी बार्शीच्या वैष्णवीचा सांभाळ केला. हीच वैष्णवी उल्हास पोटे चाकूरच्या जगत् जागृती विद्या मंदिरातून इयत्ता दहावी ला ९८ टक्के गुण घेऊन उत्तिर्ण झाली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल संस्था सचिव नरेश पाटील चाकूरकर यांनी अभिनंदन केले.


         बार्शी येथे वैष्णवीच्या वयाच्या सहाव्या वर्षी आई रंजना चा मृत्यू झाला तर वडील उल्हास ती दहा वर्षाची असताना देवा घरी गेले. त्यामुळे अहमदपूर येथील योजना मलशेट्टे या मावशीने यशवंत विद्यालयात पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. तर पाचवी पासून दहावीपर्यतचे शिक्षण चाकूर येथील जगत् जागृती विद्या मंदिरात आजी सुशिलाबाई व आजोबा विश्वनाथ शेटे यांनी पुर्ण केले. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीने असा शैक्षणिक प्रवास करत शालांत प्रमाणपत्र परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवत अठ्यान्नव टक्के गुण घेतले आहेत.


         आई बाबा मी पास झाले हे सांगण्यासाठी आई वडील नाहीत म्हणून ती खचली नाही तर आजी आजोबा व मावश्याच माझ्यासाठी सर्वस्व आहेत असे ती म्हणते. भविष्यात डाॅक्टर होऊन पैसे कमावण्याला प्राधान्य न देता ते एक सामाजिक कार्य आहे. असा पायंडा पुन्हा एकदा समाजात निर्माण होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मोठ्या अभिमानाने वैष्णवीने सांगितले. तिच्यासाठी तीची पुण्यात उद्योजक असलेली पल्लवी पानगावे ही मावशी रोल मॉडेल आहे. विद्यार्थांनी वर्ग शिक्षकांनी शिकवलेले गृहन करून स्व:अध्यायनावर भर द्यावा असे ती सांगते. वैष्णवी ला मुख्याध्यापक डॉ. प्रल्हाद तिवारी, पर्यवेक्षक संजय नारागुडे, वर्ग शिक्षक प्रकाश एतलवाड, प्रदीप उत्सुर्गे, अरविंद तोंडारे, शाम कल्याणकर, सुधीर शेटकर, बिपीन जिरगे यांचे मार्गदर्शन लाभले.


Post a Comment

0 Comments