Latest News

6/recent/ticker-posts

लातुरात पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचे कोरोनाने निधन

लातुरात पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचे कोरोनाने निधन



खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडत नसल्याची चिठ्ठित खंत


लातूर: (प्रतिनिधी) येथील जेष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचा २९ जुलै रोजी कोरोना महामारीने मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व हृदयाचा आजार होता. खाजगी रुग्णालयाचा भरमसाठ आणि मनमानी खर्च परवडत नसल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याची खंत मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठित व्यक्त केलेली आहे. त्यांची खंत खाजगी रुग्णालयाच्या बाजारू उपचारा बद्दल चीड आणणारी आहे. पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या काळात वार्ताकन करीत आहेत. मात्र त्यांच्या व कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल शासना सह कुणालाही सोयरसुतक दिसत नाही. अनेक पत्रकारांच्या कुटुंबात आजही अत्यंत वाईट परिस्थिति आहे. पत्रकार गंगाधर सोमवंशी हे परखड़ आणि वास्तववादी पत्रकार होते. त्यांनी आपल्या लेखनीतून अनेक सामाजिक समस्याना वाचा फोडली, अनेकांना न्याय मिळवून दिला. मात्र त्यांना मधुमेह आणि हृदयाचा आजार होता. गेल्या महिन्यात त्यांनी लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले, मात्र तेथील २० ते ७५ हजार रूपयांचा खर्च आवाक्या बाहेरचा असल्याने त्यांनी २ जुलै रोजी येथील जिल्ह्य शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्या दिवशीच सोमवंशी यांनी एक चिठ्ठी लिहून लातूर मधील महागड्या खाजगी उपचाराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments