निटूर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रगतीपथावर
निटूर:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण भौतिक सुविधेत दिवसेन दिवस वाढ होताना दिसत आहे.निटूर येथील आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी एस.बी.मोरे डॉक्टर प्रतिक्षा पवार(मोरे) पती-पत्नी या जोडप्याने निटुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कायापलट केले शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर येथून सेवा बजावू एप्रिल २०१८ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर येथे ते रुजू झाले डॉक्टरांनी दवाखान्यात आवश्य त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोया केली.त्याचंबरोबर दवाखाना आवारात लिंब,बांबू ,चंदन सागवान, शेवगा, सनंदडी,चिंच सिताफळ, जाम, बोरी सह काही ठिकाणी मनमोहक असे फुलांचे झाडही लावली आहेत त्यामुळे दवाखाना परिसर प्रसन्न व शोभून दिसत आहे.मधोमध वाहनतळ बैठक व्यवस्था आहे.
यात मुळात चार सफाई कर्मचारी गरज असताना सध्या येथील जिल्हा परिषद प्रशाला,निटूरचे दोन शिपाई कर्मचारी सध्या कोविड-१९ प्रार्दुभावामुळे कार्यरीत आहेत कायम किमान दोन शिपाई देणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया डॉक्टर मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
0 Comments