लाखों भाविकांचे श्रध्दांस्थान हाकानीबाबा व कैलास टेकडी जञा भरलीच नाही
अनेक याञेकरुचा झाला हिरमोड कोरोनाच्या हाहाकांरामुळे जञेवर आले संकट
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान हाकानीबाबा व कैलास टेकडी वर दरवर्षी मोठ्या प्रमाणात जञा भरते पण यावर्षी जञा भरलीच नाही.म्हणून अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे.हिंदु - मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ही जञा पंचक्रोशीत प्रसिध्द आहे.भल्याउंच टेकडीवर देवस्थान आहे.जवळपास दोनशे ते तीनशे पायऱ्या आहेत.आजुबाजुला दांड झाडे आहेत.अत्यंत निसर्गमय वातावरण येथे आसतो. आपले नवस फेडण्यासाठी परराज्यातुन सुध्दा भाविक येत असे लातुर जिल्ह्यातुन गावागावातुन श्रध्दालु दर्शनासाठी येत असे. दरवर्षी स्थानिक प्रशासनांच्या वतीने अनेक सोय सुविध पुरवत असे आरोग्य विभाग,पोलीस विभाग,पंचायत समिती विभाग,महसुल विभागांच्या वतीने भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असे. जञामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत होता. व्यापारी आपले साहित्य घेऊन येथे दरवर्षी विक्री करण्यासाठी आप आपली दुकाने लावत असतात.हॉटेल,मिठाईचे स्टॉल, लहान मुलांच्या खेळणीचे साहित्य ,खोड पदार्थ विक्री ,मौत का कुआ,रथपाळणी,असे व्यवसाय करण्यासाठी लोक येत असे.राजकीय व सामाजिक काम करणारे पुढारी व सेवाभावी संस्था याञेकरुच्या स्वागतासाठी मोठमोठे पोस्टर बॕनर लावत असे पिण्यांच्या पाणीची व्यवस्था राजकीय पक्षाच्या वतीने नेते मंडळी करीत असे.भाविकांसाठी ये जा करण्यासाठी एस.टी.महामंडळ,रेल्वे सेवा राहत होती.एकंदरीत ही जञा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असते.भाविक आपल्या नवस फेडण्यासाठी चादर,फुले,नारळ फोडून देवेद दाखवत असतात. आज संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने थैमान माजवला आहे.कोणातेही धार्मिक व राजकीय कार्यक्रम घेण्यास शासनांची परवानगी नाही.कोरोनांचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी गर्दी करु नये असे शासनांचे निर्देश असल्यामुळे यावर्षी हाकानीबाबा व कैलास टेकडीची जञा रद्द करण्यात आली.अनेक भाविकांचा याञा रद्द झाल्यामुळे हिरमोड झाला आहे.
0 Comments