तलाठी बी एन चव्हाण कडून सातबारा घेताना शेतकरी मदार माकने,भाजपाचे सुधाकर चव्हाण,भंम्पू चव्हाण,नारायण भोयबार
केळगाव:(वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव,राठोडा, बुजरूकवाडी,डागेवाडी, येथील शेतकऱ्याला खरीपचा विमा भरण्यासाठी सातबाऱ्याची आवश्यकता आहे.परंतु सध्या कोरोनामुळे संपूर्ण लातूर जिल्हा लॉकडाऊन आहे कलम १४४ चे कडक पालन असल्याने शेकरी बांधव निलंगा जाता येत नाही त्यामुळे या चार गावचे मध्यवर्ती ठिकाण केळगाव असल्याने शिवाजी आश्रम शाळा केळगाव येथे तलाठी बी एन चव्हाण हे सातबाऱ्याचे वाटप करत आहेत जर कोणत्या शेतकऱ्याकडे येण्यासाठी दुचाकीची सोय नसेल अशा शेतकऱ्यांजवळ स्वतः जाऊन तलाठी सातबारा वाटप करत आहेत त्यामुळे या सुविधेमुळे शेतकार्यातून समाधान व्यक्त होत आहे.
काल भाजपचे सुधाकर चव्हाण,शेतकरी मदार माकने नारायण भोयबार सह अनेक शेतकऱ्याने या सहज सातबारा वाटपाचे लाभ घेताला आहे
३१ जुलै पर्यत सातबारा वाटप आहे असे तलाठी चव्हाण यांनी सांगितले आहे
0 Comments