औसा नगरपालिकेची निविदा बेकायदेशीर असल्याची तक्रार
औसा:(ता.प्रतिनिधी/बी.जी.शेख)
औसा नगरपालिकेने शहरात विविध कामासाठी ई निविदा१३/७/२०२० रोजी जाहीर केली होती ही जाहीर केलेली निविदा नियमबाह्य असल्याची तक्रार येथील काही संस्थेच्या लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत पुढील बाबींची कमतरता असल्याचे म्हटले आहे ज्यामध्ये
१) पूर्वीच्या निविदेमध्ये कामाचा कालावधी एक वर्षाचा होता तो चार महिन्याचा करण्यात आला आहे.
२) यापूर्वीच्या निविदेमध्ये वेगवेगळ्या कामाची स्वतंत्र निविदा होती ती एकत्र करून सर्व कामे एकत्रित करण्याची निविदा आहे.
३) कोणती कामे कोणत्या प्रभागात आहेत हे स्पष्ट रित्या सांगितले गेले नाही.
४) नगर नियमाच्या नियमानुसार ही निविदा नसल्याचे म्हटले आहे.
५ )सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्थावर अन्याय होईल.
६)EPF ला सूट देण्यात आलेली नाही.
७) निविदा हार्ड कॉपी नगरपालिकेत देण्याचे बंधन करण्यात आले आहे.
८) निविदे साठी आवश्यक बॉंड पेपर उपलब्ध होत नाहीत.
अशा विविध त्रुटी सह ही निविदा असल्यामुळे नियमबाह्य आहे असे तक्रारीत म्हटले आहे . जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयात योग्य दाद मागितली जाईल असाही इशारा देण्यात आला आहे. दिलेल्या तक्रारी मध्ये सय्यद इमरान, बंडू सागर, शेख अझहर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments