Latest News

6/recent/ticker-posts

उदय निटूरे यांची विभागीय सचिव पदावर नियुक्ती

उदय निटूरे यांची विभागीय सचिव पदावर नियुक्ती



निलंगा:(प्रतिनिधी) मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या विभागीय सचिव पदावर प्रदेशाध्यक्षा शिवमती डॉ.निर्मलाताई पाटील यांनी नियुक्ती केली आहे.उदय निटूरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पासून केलेले संघटनात्मक काम व परिवर्तनवादी चळवळीतील योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.शिवकाव्यगाथा हा शिवचरित्रावर आधारित कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांची शिवकवी उदय निटूरे ही ओळख जनसामान्यात रुजली आहे.जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर त्यांनी यापूर्वी काम केलेले असून त्यांना साहित्य परिषदेच्या माध्यमातून विभागीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.प्रकाश काळे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश राऊत,सुनंदाताई जरांडे, प्रदेश सचिव बालाजी जाधव उजेडकर, सहसचिव डॉ.स्वप्निल चौधरी, प्रदेश संघटक सतिश हानेगावे,विभागीय अध्यक्ष नागनाथ जाधव, लातूर जिल्हाध्यक्ष विवेक सौताडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष युवराज धविले, जिल्हा सचिव ब्रिजलाल कदम यांच्या सह अनेक मान्यवर व चळवळीतील कार्यकर्ते यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments