मूलभूत सुविधा ऐवजी अनावश्यक खर्चाकडे औसा नगरपालिकेचा कल
औसा:(ता.प्रतिनिधी.बी जी.शेख) औसा नगरपालिकेत वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यक असलेल्या बाबीकडे दुर्लक्ष करून इतरत्र अनावश्यक खर्च करण्याकडे नगरपालिकेचा कल वाढलेला आहे. म्हणजे एक प्रकारे मनमानी कारभार केला जात आहे.औसा शहर मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. या विस्तारलेलल्या भागात ज्या बाबी आवश्यक आहेत त्या बाबींची पूर्तता न करता शहरात ईतर ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी नगरपालिका पुढाकार घेत आहे .सुशोभीकरण करणे योग्य असले तरी स्थानिक जनतेला मूलभूत सुविधा देणे नगरपालिकेचे कर्तव्य आहे ते कर्तव्य विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी व जवळच्या कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी नगरपालिका हे पाऊल उचलत आहे, अशा तक्रारीचा सूर जनतेमधून ऐकायला मिळतो. वेळोवेळी फोन करून व प्रत्यक्ष भेटून स्थानिक नगरसेवकापासून ते नगराध्यक्षा पर्यंत विनंत्या करून देखील सुविधा पुरवल्या जात नाहीत, पावसाळ्यात जनतेला येण्या-जाण्यासाठी योग्य प्रकारचा रस्ता नसल्याने जागोजागी चिखलाचा रस्ता बनला आहे त्याठिकाणी साधे मुरूम देखील नगरपालिका टाकत नाही.रॉयल्टी चे कारण पुढे करून आम्हाला परवानगी नाही असे उत्तर मिळत आहे. वीस दिवसापासून ते एक महिन्यापर्यंत नळाला पाणी येत नाही, मागील तीन दिवसापासून स्टेट लाईट बंद करण्यात आली आहे, त्यामुळे शहरात रात्रीच्या वेळी काळोख पसरलेला आहे. महावितरण कंपनीचे थकीत बिल न दिल्यामुळे स्टेट लाईट कपात करण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले आहे.कोरोना काळामध्ये किमान जनतेच्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे पालिकेने लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
0 Comments