आनंदमुनी विद्यालय केळगावचा शंभर टक्के निकाल
केंद्रात प्रथम:बिरादार विजयकुमार
केळगाव:(प्रतिनिधी/ वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे फेब्रुवारी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत विज्ञान शाखेने १००% टक्के निकाल लागला असून वाणिज्य शाखेचा ९४.२८% तर कला शाखेचा ७७.३५% असा निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आनंदमुनी विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.विज्ञान शाखेतून बिरादार विजयकुमार ८४℅ घेऊन केंद्रात प्रथम आला आहे तर पाटील शारदा ८२.४६ % द्वितीय तर कुलकर्णी गौरी ८१.३८% तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून शिंदे वैष्णवी ८०.१५% द्वितीय खोत ज्ञानेश्वर ७७.६९% प्रथम तर जनमले विठ्ठल७६% तृतीय आला आहे कला शाखेतून मुगळे विद्या ७०.९२% प्रथम तर कुमठे प्रकाश ६९.६९% द्वितीय तर राठोड अश्विनी ६८.७६% तृतीय आला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुनअप्पा मिटकरी, सचिव प्रकाशराव अट्टरगेकर, प्राचार्य सिद्राम मिटकरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments