आनंदमुनी विद्यालयाचा निकाल ८८.२३ टक्के
निलंगा:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी मा.व उच्च माध्यमिक विद्यालयाने शालांत प्रमाणपत्र परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल ८८.२३ टक्के लागला आहे.
पांढरे सीमा मुक्तार ९२ टक्के गुण घेवून प्रथम,दूधभाते अश्विनी भरत ८६.४० टक्के गुण घेवून व्दीतीय तर शेख शाहीन लायक ८५ टक्के गुण घेवून तृतीय आली आहे.२१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर २७ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.ग्रामीण भागातील या विद्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भारतीय संस्कृती पोषण संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मिटकरी,सचिव अॕड.प्रकाशराव अट्टरगेकर व सर्व कार्यकारी संचालक व प्राचार्य, सिद्राम मिटकरी, शिक्षक आणि शिक्षक्केत्तर प्राचार्य सिद्राम मिटकरी यांच्यासह शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments