उदगीरीत पुन्हा कोरोनाचा उद्रेक आज १४ रुग्ण
उदगीर:(प्रतिनिधी) लातुर जिल्ह्यात गेल्या १५ जुलै पासुन लॉकडाउन लावण्यात आले आहे. तेंव्हापासुन कमी जास्त प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या निघतच आहे. आज तापसण्यात आलेल्या स्वॉब व रॅपिड टेस्टिंग या दोन्ही तपासण्यात आज दि. २९ रोजी १४ रुग्णांची भर पडली असुन सध्या ६१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जुलै महिन्यात कोरोनाचा उद्रेक दिसुन येत असुन या महिन्यात १४४६ रुग्ण सापडले आहेत. ही संख्या धोक्याची घंटा असुन अशी रुग्ण संख्या वाढत गेलीतर या साथीच्या रोगाचा प्रादुर्भावामुळे खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. आज जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी वाढती संख्या चिंता निर्माण करीत आहे. यात सारीच्या रोगाची रुग्ण संख्या व मृत्यू प्रमाण ही अधिक आहे.
आज दि. २९ जुलै तपासण्यात आलेल्या स्वॉब व रॅपिड टेस्टिंग या दोन्हीमध्ये १४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात हंडरगुळी- २, नागलगाव- १, देगलूर रोड- ३, आर्यसमाज- १, रेड्डी कॉलनी- २, रेल्वे स्टेशन- १, प्रिन्स लॉज- १, आंबेडकर सोसायटी- १, डोंगरशेळकी- १, शास्त्री कॉलनी- १ असे रुग्ण सापडले आहेत.
0 Comments