शिवाजी आश्रम शाळेचे दहावीत नेत्रदीप यश
सानिया शकील पांढरे ९४.९१
अंकिता अनंत पाटील ९०.६०
फरहीन गफ्फार पांढरे ८६.६०
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम तुराब मुजावर) निलंगा तालुक्यातील शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा केळगावचा ९४.९१%निकाल लागला आहे.एकलव्य मागास सेवा समिती मानखेड द्वारा संचलित शिवाजी प्रा.माध्यमिक आश्रम शाळा केळगाव(तांडा) येथील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल ९४.९१ टक्के लागला आहे.
शाळेतून सानिया शकील पांढरे ९३.४० टक्के गुण घेऊन केळगाव गावात प्रथमआली आहे,तर अंकिता आनंत पाटील ९०.६० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर फरहीन गफ्फार पांढरे या विद्यार्थ्यांनीने ८६.६० टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे
विशेष प्रावीण्य २१ विद्यार्थी, प्रथम श्रेणी २४ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ९ विद्यार्थी, पास विद्यार्थी २
ग्रामीण भागातील आश्रम शाळेच्या मिळवलेल्या या यशाबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. एकलव्य मागास सेवा समिती मानखेड संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव विठ्ठलराव भिकाने, संस्थेचे सचिव सचिन शिवाजीराव भिकाने, सहसचिव शशिकिरण उत्तमराव भिकाने , मुख्याध्यापक बी.आर.झाडे,डी बी पासमे,बालाजी राठोड,राजपाल काळे,सदानंद चिंचकुटे, यांच्यासह सर्व शिक्षकाने गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments