कोरोना बाधीत रुग्णांनी मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी काळजी घेण्याचे मनोविकारशास्त्र विभागाचे आवाहन
मानसिक आरोग्य विषयक शंका प्रश्नांसाठी संपर्क मनोविकार तज्ञाकडे संपर्क करावा
लातूर:(प्रतिनिधी) मनोविकारशास्त्र विभागाकडून मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सर्व कोरोना बाधित रुग्णांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी
आपल्याला आपल्या आजाराचे उपचार / तपासणी करण्यासाठी या ठिकाणी ठेवले आहे परंतु ही काही शिक्षा नव्हे. आपल्यापासून इतरांना संसर्ग टाळणे करीता वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. आपल्या शरीर स्वच्छतेकरिता वारंवार हात धुणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण स्वत:ही सुरक्षित आणि आपले परिवार ही सुरिक्षत राहील. जर आपली तपासणी निगेटिव्ह आली तरी सुध्दा आपणाला स्वत:ची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपली तपासणी पॉझेटिव्ह आली तर चिंता करु नका. प्रार्थना करा की आपण या आजारातून सुरक्षित बाहेर येऊ. खात्री बाळगा ९८ टक्के कोरोना बाधीत रुग्ण् या आजारातून सही सलामत बाहेर पडतात.
समजा आपण कोरोना पॉझेटिव्ह आहात याचा अर्थ असा नाही की, आपला जीव धोक्यात आहे. या आजाराने केवळ २ टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आपण विचार करावा की मी उर्वरीत ९८ टक्के मध्ये आहे. ही आपल्या संयमाची परीक्षा आहे तरी आपण संयम पाळावा. आपणांस काही दिवस इतरापेक्षा वेगळे राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आई-वडिल, मुले व परिवारातील इतर सदस्य सुरक्षित राहतील. ही वेळ अवघड निश्चितच आहे, परंतु हे ही दिवस जातील. जर आपल्या मनात काही चिंता, उदासिनता किंवा मरण्याविषयीचे विचार येत असतील तर, कृपया करुन खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करुन शंकांचे समाधान करुन घ्यावे. तुमच्या मानसिक आरोग्य विषयक शंका प्रश्नांसाठी संपर्क
सुरेंद्र सुर्यवंशी- मो.नं. ९४२०२०२५७७, संजीव लहाने मो.नं.-७५८८६१२५३३, श्रीमती शिला कांबळे मो.नं. ९१७५९१४७४७, अण्णाराव कुंभारे मो.नं. ९२८४६३७७३८, श्रीमती सरिता शेंडे मो.नं. ९९२२०८७८३४, श्रीमती शिल्पा टाकणकर मो.नं. ७३२०२६३१४३
0 Comments