Latest News

6/recent/ticker-posts

२५ ते ३१ जूलै दरम्यान लातूर जिल्हयात लॉकडाऊन अधिक कडक                                                                       

२५ ते ३१ जूलै दरम्यान लातूर जिल्हयात लॉकडाऊन अधिक कडक                                                                                  



नियमांची काटेकोर अमंलबजावणी करा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश


लातूर:(प्रतिनिधी) दि. २४ जूलै वाढत्या कोवीड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात सुरू असलेला लॉकडाऊन २५ ते ३१ जुलै दरम्यान अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन प्रशासन व पोलिस यंत्रणेनेनियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणसांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीदिल्या आहेत. अलीकडच्याकाळात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर लातूर जिल्ह्यात १५ जुलै  पासून पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे.यात १५ ते २० जुलै दरम्यान लॉकडाऊनचे नियम कडक ठेवण्यातआले होते. त्याचे तंतोतंत पालनही करण्यात आले. मात्र जनतेला भाजीपाला, किराणा माल घेतायावा म्हणून २१ जुलै नंतर लॉकडाउनच्या नियमात थोडी शिथिलता देण्यात आली होती. ही शिथीलतामिळताच लोकांनी बाजारपेठेत, रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. २१ ते २४ जुलै च्या दरम्यान झालेल्यालोकांच्या गर्दीमुळे लॉकडाऊनचे नियम पाळले जात नाहीत हे लक्षात आले असून त्यामुळे कोविड-१९ प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे, हीबाब लक्षात घेऊन २५ ते ३१ जुलै दरम्यान लॉकडाऊन अधिककडक करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे. या संदर्भाने अधिक तपशील जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments