लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मुस्लिम मामा बाबाभाई
अहमदनगर: भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. एखादा सलीम दाढी टोपी सहित ज्यावेळी एखाद्या मित्राच्या लग्नांत अक्षदा वाटताना किंवा पंगतीला आग्रहाने जेवण वाढताना दिसतो तर कधी एखादा राम अब्दुलच्या इथे त्याच्या वृद्ध आई वडलांना मदत करताना दिसतो. बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली.
हेच बाबाभाई गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात गेल्या वर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता. बाबाभाई पाच वेळेचे
नमाजी असून एक ईश्वरवादी एका अल्लाहला मानणारे आहेत. परिसरातील बहुसंख्य जण बाबाभाईच्या अस्थेचा आणि धार्मिक प्रथाचा आदर करतात तर इतरही धर्मातील आस्था याचा बाबाभाई आदर करतात. बाबाभाई आणि बोधेगाव मधील हाच बंधुभाव भारतात पाहण्यासाठी मिळतो जो इतर कुठेही पाहायला मिळत नाही काही राजकीय आणि धार्मिक द्वेषाच्या बुद्धीने वावरणाऱ्या मानसिकतेमुळे वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली जाते पण या देशातील वटवृक्षाची बीजे हि प्रेमाने भरलेली असतात. त्यांना आधार देण्याचं काम बाबाभाई तसेच बोधेगावच्या ग्रामस्थांसारखे लोक करत असतात.
_मराठी मुसलमान
0 Comments