नुकसानग्रस्त मूग व उडीद पिकाचे पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश देणार
कृषी मंत्री दादा भुसे यांची आमदार बाबासाहेब पाटील यांना ग्वाही
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर- अहमदपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर - अहमदपूर तालुक्यातील मूग आणि उडीद या पिकांचा गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची पाहणी करण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील उजना येथे युनूस शेख या शेतकऱ्यांच्या मूग पिकाची पाहणी केली समवेत जि.प. सदस्य माधव जाधव,व्यंकट वंगे, शिवशंकर आगलावे सह शेतकरी उपस्थित होते तसेच चाकूर तालुक्यातील विविध गावात जाऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला या संपूर्ण नुकसानीची माहिती त्यांनी माननीय मंत्री महोदय यांना दिली तसेच यासंबंधीचे निवेदन सुद्धा कृषिमंत्री यांना यांना पाठवले असून आपण शासनाकडून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती कृषिमंत्र्यांना आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली. यानंतर आ. बाबासाहेब पाटील यांना कृषी मंत्री दादा भुसे यांनी मी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देतो व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांना भ्रमणध्वनी द्वारे दिली आहे.
0 Comments