तेरा दिवसांच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत टाकुन खुन,चाकुर तालुक्यात झरी येथील क्रुर घटना
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यातील झरी(बु) ता.चाकूर येथे एका तेरा दिवसाच्या गोंडस मुलीचा पाण्याच्या टाकीत टाकून खून करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (ता.२९) घडली आहे. हुडगेवाडी (ता.चाकूर) येथील एक महिला बाळंतपणासाठी झरी (बु) येथील माहेरी आली होती. तेरा दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. शनिवारी सकाळी अचानक घरातून ही मुलगी गायब झाली. यामुळे घरातील व्यक्तींनी मुलीचा शोध घेतला. परंतू ती कुठेही आढळून आली नाही. काही वेळानंतर घरातील एका व्यक्तींने पाण्याच्या टाकीचे झाकण काढून पाणी काढत असताना त्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड, बीट जमादार प्रशांत भंडे, अर्जुन तिडोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जाणवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. याबाबत अधिक तपास करून पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यांनी सांगितले.
0 Comments