Latest News

6/recent/ticker-posts

चाकूरात भाजपचे घंटानाद आंदोलन

चाकूरात भाजपचे घंटानाद आंदोलन



चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांची बंद असलेली दारे उघडण्यात यावी व सर्व भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताचे नियमित दर्शन घेता यावे याकरिता चाकुर भाजपा च्या वतीने निद्रा अवस्थेत असलेल्या सरकार ला जागे करण्यासाठी शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकुरकर., शहर सरचिटणीस अशोक शेळके, मा.शहराध्यक्ष विष्णू डोंजे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गजानन करेवाड, दिपक जनवाडे, सचिन एनकफळे, आनंद बेजगमवार, शिवम रुपनर, बाळु कळसे, आदि कार्यकर्ते , पदाधिकारी सहभागी होते.


Post a Comment

0 Comments