Latest News

6/recent/ticker-posts

आज राजीवजी खरोखर जिंकले...

ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून... 


आज राजीवजी खरोखर जिंकले...



क फोटो viral झाला..झाला की मुद्दाम केला हे उद्धवजी यांच्या मीडिया टीमला माहीत..मात्र जे झाले ते खरोखरच राजकीय विचारवंताला विचार करायला लावणारं आहे.राजीव गांधी कोणा एकाचे नव्हते..कुणी याला उद्धव ठाकरे यांची लाचारी म्हणेल,कुणी राजकीय adjustment म्हणेल,कुणी सत्तापिपासू म्हणेल..ज्यांना जे म्हणायचे ते म्हणत बसा..उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात नवीन राजकीय ध्रुवीकरण करण्यास सुरुवात केले आहे हे मात्र खरे.देशाचा पंतप्रधान एका जातीचा,एका धर्माचा असूच नये.तो देशाचा हवा.सामान्य माणसाच्या पायात काटा टोचला तर चटकन त्याच्या डोळ्यात पाणी यायला हवे..सध्याच्या काळात ते दुर्मिळच आहे.राजीव गांधी यांची जयंती मातोश्रीवर साजरी झाली की उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कक्षात साजरी झाली याला महत्त्व नाही.त्यांनी राजीव गांधी यांच्या फोटोला हार घालून ती साजरी केली आणि महाराष्ट्राला दाखवून दिले की सत्तेच्या प्रांगणात आम्ही सगळे एक आहोत,फक्त भाजप सोडून..काही राजकीय निरीक्षक याला शुध्द लाचारी म्हणतील,बाळासाहेबांचे दाखले देतील मात्र उद्धव ठाकरेंनी जे केले ते राजकीय स्वर्थापेक्षही एका माजी पंतप्रधानांसाठी केले..आता त्यात खंड पाडू नये..प्रत्येकवेळी अगदी अटलबिहारी यांची सुध्दा जयंती,पुण्यतिथी साजरी करावी..


राजकीय आचारसंहिता आणि विचाराची लढाई आता कुठे राहिली आहे.बिहारमध्ये मयावतीसोबत घरोबा करताना कुठली आचारसंहिता भाजपने पाळली.अगदी खालच्या थरापर्यंत सगळीकडे केवळ सत्तेसाठी कुणाच्याही गळ्याला पडण्याचा कार्यक्रम आजही होतोय.महाराष्ट्रात पक्षात घेतलेल्या राजकीय नेत्यांचे इतिहास थोडे तपासून पहावेत.काही काही तिकीट ट असे वाटप केले की, स्टेजवर मोदींच्या भाषणातच त्यांनी पूर्व पक्षीय स्वतःच्या नेत्यांची नावे घ्यायला सुरुवात केली.सत्तेसाठी विचारांची काडीमोड करण्याची स्पर्धा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी जयंती साजरी केली तर बिघडले कुठे?आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याच कार्ट अशी प्रथा आता राजकरणात सुरू झाली आहे.प्रत्येकानी राजकीय स्वार्थासाठी आपल्या पोळीवर तूप ओढण्याचे काम सुरू केले आहे.


शिवसैनिकांना हे पचणे थोडे अवघड आहे,मात्र सवय करून घ्यावी लागेल.कडक हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवून मुस्लिम बहुल वसाहतीत फिरून मते मागावी लागतील.टांगून मिरचीचा धूर देण्याची भाषा आता बंद करावी लागेल.जय श्रीरामची घोषणा देताना आजूबाजूला कोणी ऐकत तर नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.गळ्यातल्या भगव्यात आता हिरवा,निळा रंग पेरावा लागेल.हिंदुत्व ही महाराष्ट्रात आपली मालकी होती ती बदलावी लागेल कारण मालक हळूहळू बदलू पाहत आहेत.


काँग्रेसचा विचार इतक्या सहजपणे पेलणे अवघड आहे.त्यासाठी अनेकजणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.सर्वधर्म समभाव ही घोषणा नाही कृती आहे.सगळ्यांना सोबत घेवून जाण्याची आणि देश निधर्मीवादी आहे हे सांगण्यासाठी खूप सोसावे लागते.काँग्रेस कधीच आपल्या विचारापासून ढळली नाही.मुस्लिम घरात जाताना तिला कधीही संकोच वाटला नाही.अलीकडे भाजपने काही मुस्लिम पोपट बाजारात सोडले आहेत.त्यांच्या विचारात आणि कृतीत फरक आहे.त्यामुळे काँग्रेसचा विचार पेलण्याची ताकद इतक्या सहजपणे शक्य नाही.राष्ट्रवादी काँग्रेस आजही हा विचार धारण करू शकली नाही,एका विशिष्ट समाजाचा पक्ष खूप काळ टिकत नसतो,त्यासाठी विचाराची बैठक असावी लागते.शरद पवार या व्यक्तीत ती ताकद आहे,मात्र त्यानंतर काय?


उध्दवजी आपल्या या राजकीय समीकरणाचे मी जाहीर समर्थन करतो.काँग्रेसचा विचार फक्त पेलावा,तो कृतीत आणावा..आपण आणि आपल्या पक्षाने जर हा विचार स्वीकारला तर इंदिरा गांधी पासून ते राजीव गांधी पर्यंत सगळ्यांनी जे या देशाच्या विकासात केले त्याची फलश्रुती झाली असे म्हणायला हरकत नाही..राजीव जी आज आपण खरोखर जिंकला आहात.आपण सत्तेत असताना समस्त मानवजातीचा विचार केला आहात..आज विरोधक सुध्दा आपली जयंती साजरी करत आहेत,यातच सगळे भरून पावले...


संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार)


Post a Comment

0 Comments