कोशिकी(मार्शल आर्ट) राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी शेख जबीर तर सचिवपदी किरण यादव
नागपूर:(प्रतिनिधी) अखिल भारतीय कोशिकी फेडरेशनने राज्यात या खेळाचा प्रसार व प्रचार करण्याकरिता राज्य संघटना गठीत करून अध्यक्षपदी शेख जाबीर तर किरण यादव यांची सचिव म्हणून निवड केेली. कोशिकी फेडरेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद फिरोज, ताज मोहम्मद यांनी ही नियुक्ती केली. महाराष्ट्रात शेख जाबीर आणि किरण यादव यांच्याकडे आगामी काळात कोशिकी(मार्शल आर्ट) स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी दिली आहेया दोघांच्या नियुक्तीवर महाराष्ट्र कोशिकी असोसिएशनचे सदस्य व कराटे मास्टर, नरेंद्र बिहार, तुषार डोईफोडे, विनोद डहारे, नीलखाम कुकाडे, शुभम पडोळे, वैभव ब्रह्माकर, साहिल पाटील, अश्विनी राऊत, काजल राऊत, आंचल राऊत, कीर्ती कुमरे, संदेश खरे, प्रवीण सुलताना, शशांक विश्वकर्मा, मोहम्मद आदीने अभिनंदन केले.
0 Comments