Latest News

6/recent/ticker-posts

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट; प्रशासनाकडुन नियम,अटीचे बंधन,लगबग सुरु

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट; प्रशासनाकडुन नियम,अटीचे बंधन,लगबग सुरु



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) वर्षभर ज्याची सर्वजण अतुरतेणे वाट पाहता असतो तो गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर आला आहे.यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रशासनांकडुन नियम अटीचे बंधने घालण्यात आली आहेत.असे असले तरी घरोघरी भाविकांकडुन गणेशोत्सवाच्या तैयारीची लगबग उत्साहात सुरु झाली आहे.बाजारातही विविध रुपातील आकर्षक मुर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या असुन शहारातील बाजारपेठ गर्दीने गजबजल्या आहेत,


सध्या कोरोनांचे संकट कायम असले तरी गेल्या महिनाभरापासुन शहर व ग्रामीण भागातील मुर्तीकारांकडुन मुर्ती घडवण्याचे काम सुरु आहे.आकर्षक व वेगळ्या रुपातील मुर्तीकार बप्पावर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे.पर्यावरणाचे हीत लक्षात घेऊन शाडुमातीच्या पर्यावरणपुरक अशा मुर्ती जास्त प्रमाणात बनवल्या जात आहेत.भाविकांकडुन विविध रुपातील आकर्षक व अनेक रंगानी रंगलेल्या सुबक मुर्तीना जास्त मागणी असते.परंतु यंदा कोरोनांचे सावट असल्यामुळे गणरायाच्या मुर्तीची उंची कमी करण्यात आली आहे.याचा फटका मुर्तीकारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.यासोबत भाविकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यापेक्षा घरोघरीच हा उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा,यासह इतर नियम अटींचे बंधने घालण्यात आली आहेत.कोरोनांचा संसर्ग वाढु नये यासाठी सुरु केलेल्या लॉकडाऊनचे परिणाम या व्यवसायावरही झाले असुन यंदा शाडु माती तसेच रंग साहित्याचा किंमतीत किमान १५% वाढ झाल्याचे माहित येथील मुर्तीकारांनी सांगितले .संकटहर्ता अशी ओळख असलेल्या गणेशोत्सव एक दिवसांवर येऊन ठेपला आहे.यंदा कोरोनांचे संकट कायम असले तरी भाविकांकडुन आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव साजरा करण्यासाठी उत्सहात लगबग सुरु झाली आहे.यामुळे शहरातील विविध भागातील बाजारपेठेत गर्दीने गजबजल्याचे दिसुन येत आहे.


सार्वजनिक गणेशोत्संवाना ४ फुटपेक्षा उंच मुर्ती बसविता येणार नाही.घरच्यासाठी दोन फुटांपेक्षा उंच मुर्ती असता कामा नये.शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात आरती व इतर कार्यक्रमांसाठी चार व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्ती असता कामा नये.ध्वनीप्रदुषनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देश पाळण्यासमवेत कोणताही देखावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाना करता येणार नाही.याशिवाय सॕनिटायझर,मास्क,आदि सुरक्षितेचे उपाय हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाना बंधनकारक करण्यात आले आहे. 


Post a Comment

0 Comments