सोयाबीन पिकावर तात्काळ फवारणी करण्याचे आवाहन
लातूर:{प्रतिनिधी}दि. २८ - पोळयानंतर आलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात काही ठिकाणी अतिरीक्त वाढ झाल्याचे आढळून येत आहे.मागील १० दिवसात झालेल्या संततधार पावसामूळे शेतात वापसा नसल्यामुळे सोयाबीनच्या खालच्या भागात आदृता वाढवून काही बूरशीजन्य रोग जसे शेंगावरील करपा, पानावरील बुरशीजन्य रोगाच्या प्रार्दूभावाबरोबर खोड माशी, स्पोडोप्टेरा आणि शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रार्दूभाव वाढत आहे.
सध्या सोयाबीन पिके ५५-६० दिवसाचे असून शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.अशा परिस्थितीमध्ये पूढील दिलेल्या किटकनाशक आणि बूरशीनाशकापैकी एका बूरशीनाशकाची निवड करुन तात्काळ फवारणी घेतली असता किडीचे आणि बूरशीजन्य शेंगाचे नियंत्रण होऊन चांगल्या प्रकारे शेंगाना दाणा भरण्यास मदत होईल. फवारणी करत असताना पायात गमचे शूज वापरावेत त्याच बरोबर नाक व तोंड स्वच्छ कापडानेच झाकण्याबरोबरच संरक्षणात्मक किटचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लातूर व विस्तार कृषी अधिकारी लातूर यांनी केले आहे. किटकनाशके :- क्लोरॅनट्रिनीलीप्रोल (कोराजन) १८.५ टक्के, ३ मिली. पल्यूबेंडमाईड (फेम) ३९.३५ टक्के, २.५ मिली प्रति १० लि पाणी. बुरशीनाशेके- टेब्यूकोनॅझोल+ सल्फर (स्वाधीन)-२० ग्रॅम, मॅनकोझेब+ कार्बेन्डॅझीम (साफ) -२० ग्रॅम, पायरोक्लोस्ट्रॉबीन २० टक्के (हेडलाईन)-२० ग्रॅम, टेब्यूकोनॅझोल २५.९ टक्के फॉलीक्यूअर -१५ ग्रॅम प्रति १० लि पाणी.
वरील किटकनाशके व बूरशीनाशकाचे प्रमाण चार्जीगच्या पंपासाठी दुप्पट तर पेट्रोलपंपासाठी तिप्पट करावे.असे ही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
0 Comments