Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगामी गणेश उत्सव साधेपणाने साजरे करा- पोलीस निरीक्षक जयतंराव चव्हाण 

कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगामी गणेश उत्सव साधेपणाने साजरे करा- पोलीस निरीक्षक जयतंराव चव्हाण



 चाकुर:(तालुका प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) - कोरोना या महामारी चे गांभीर्य लक्षात घेऊन आणि लातुर सह चाकुर मध्येही वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन आगामी २२ ऑगस्ट पासून  सुरु होणाऱ्या गणेश उत्सव अगदी साध्या पणाने साजरा करण्याचे आवाहन चाकुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयतंराव चव्हाण यांनी केले आह. ज्या अर्थी शासनाने कोरोना विश्व विषाणूचा म्हणजेच covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून त्यामधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आह.केंद्र शासनाकडून दिनांक २२ मार्च पासून लाक डाऊन घोषित करण्यात आले होत. व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे अॉनलॉक वाढवण्यात आले आहे. त्यानंतर शासन व जिल्हा स्तरावरून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत होत्या. आणि आजतागायत त्या करण्यात येत आहेत. परंतु लातुर जिल्ह्यात व त्याच अनुषंगाने चाकुर तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्ण संख्या विचारात घेता दिनांक २२ ऑगस्ट पासून साजरा करण्यात येत असलेला गणेशोत्सव या सणाबद्दल जिल्हाधिकारी लातुर जी.श्रीकांत यांनी मार्गदर्शक सूचना विहित केल्या आहेत. यामध्ये गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तसेच श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळात करता फक्त चार फुटाची व घरगुती गणपतीची मूर्ती फक्त दोन फुटावी असावी, असे बंधन घालण्यात आले आहे तद्वतच यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातु संगमवर आधी मूर्तीचे पूजन करावे मूर्ती ही शाडूची अथवा पर्यावरण पूरक असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृतीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात याव.त्यासाठी स्थानिक प्रशासनासह गणेश मंडळांनी कृत्रिम विसर्जन स्थळे निर्माण करावीत, विसर्जन शक्य असल्यास पुढच्या वर्षापर्यंत टाळावे जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण इकडे लक्ष द्यावे. गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्य विषयक उपक्रम शिबिरे उदाहरणार्थ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.आणि त्याद्वारे कोरोना मलेरिया डेंगू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती भजन कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईड व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून देण्याची जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी .तसेच कोणाचे सोशल डिस्टंन्स, मास्क, सॅनिटायझर ,इत्यादि अटी पाळण्यात जागरूक असावे. covid-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका नगरपालिका पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे सर्वांवर गणेश उत्सवाच्या कार्यकाळात बंधनकारक राहील. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी‌ आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही गणेश मंडळ व्यक्ती संस्था अथवा समूह भारतीय दंड संहिता १८६० रोग प्रतिबंधक कायदा १८९७ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील उपरोक्त पार्श्वभूमीवर कोरना या महामारी चा मुकाबला करण्यासाठी आगामी गणेशोत्सव अटी नियमांच्या अधीन राहून अगदी साधेपणाने साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक जयतंराव चव्हाण यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments