पं. स.चाकूर येथे मनसेचे चार तास ठीय्या आंदोलन; ७२ पैकी ४२ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही
चाकूर:(तालुका प्रतिनिधी/सलीमभाई तांबोळी) चायत समिती येथे मनसेने जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली चार तास ठिय्या मांडत उग्र आंदोलन केले व गटविकास अधिकाऱ्यांना कामचुकार व मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर लेखी कार्यवाही करण्यास भाग पाडले.सविस्तर वृत्त असे की मनसे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे हे आपल्या शिष्टमंडळासह सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांचे मिनिमंत्रालय असलेल्या पं. स.चाकूर येथे हजर झाले.त्या ठिकाणी ७२ पैकी ५ इतके मोजके कर्मचारी हजर दिसताच त्यांनी स्टिंग ऑपरेशन केले व त्यात अनुपस्थित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या खाली खुर्च्यांचे छायांकन करत प्रत्येक येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे गेटवर फोटो घेत, येण्याच्या वेळांची नोंद केली.त्यात ७२ पैकी ४२ अधिकारी उशिरा येणे,रजा न देता गायब असणे हे दिसले.हा सर्व पुरावा मनसेने गटविकास अधिकाऱ्यांना दिला व कार्यवाही करण्यास सांगितले.यात दोषी ४२ जणांवर ताबडतोब लेखी कार्यवाही झाल्याशिवाय उठणार नाही हे सांगत मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. भिकाणे यांनी कार्यालयातच शिष्टमंडळासह ठिय्या मांडला.परिस्थिती चे गंभीर्य ओळखत गटविकास अधिकाऱ्यांनी ४२ अधिकारी कर्मचारी यांना खुलासा(कारणे) दाखवा नोटीस काढली.तदनंतर मनसेने ठिय्या संपवला.तसेच हे लेट लतीफ मुख्यालयी राहवे यासाठी मनसेने ७२ जणांना नोटीस काढून अहवाल तहसीलदारांना सादर करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांना केली व लगेच त्यांनी तो आदेशही दिला कारण जवळपास ८० टक्के अधिकारी कर्मचारी हे मुख्यालयी राहत नाहीत.त्यामुळे ते लेट लतीफ होतात.यात बदल नाही झाला तर परत पं. स.ला धडकणार असे डॉ.भिकाणे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सुनावले.या आंदोलनात तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी,कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,शहराध्यक्ष अजय धनेश्वर,जनार्दन इरलापल्ले,मनवीसे तालुकाध्यक्ष दत्ता सूर्यवंशी तुलसीदास माने,मारोती पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments