Latest News

6/recent/ticker-posts

आमदार अभिमन्यु पवार यांनी दिलेला शब्द पाळला

आमदार अभिमन्यु पवार यांनी दिलेला शब्द पाळला



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) दि. २१ - तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांना काही दिवसापूर्वी कोरोणाची लागण झाली होती. त्यावेळेला त्यांनी रुग्णालयातून आपल्या कार्यकर्त्यांना व जनतेला शब्द दिला होता की, त्यांचा आजार बरा झाला की ते इतरांसाठी प्लाजमा डोनेट करतील तो शब्द त्यांनी आज पूर्ण केला. प्लाझमा डोनेट केल्याने अशा चार ते पाच व्यक्तींचे जीव वाचतात जे खूप गंभीर स्वरूपाचे आजारी झालेले असतात.प्लाझमा दान करण्यासाठी सर्रास कुणी पुढे येत नाही. "कोरोना मुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा डोनेट करण्याच्या संकल्पानुसार मी व माझा मुलगा चि परिक्षीत; आम्ही दोघांनीही आज शासकीय मेडिकल कॉलेज येथे प्लाझ्मा डोनेट केला. आमच्या दोघांचाही प्लाझ्मा क्रिटिकल पेशेंट्स ना बरं करण्याच्या कामी येणार आहे याचा मनस्वी आनंद आहे. यानिमित्ताने कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांना माझे नम्र आवाहन आहे की त्यांनीही पुढे येऊन प्लाझ्मा डोनेट करावा."अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत सीईओ अभिनव गोयल, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, उपअधिष्ठाता डॉ उदय मोहिते, वैद्यकीय अधिक्षक डॉ संतोषकुमार डोपे, डॉ संजय जगताप, कोरोना नोडल ऑफिसर डॉ. मारूती कराळे, डॉ. उमेश कानडे, डॉ. शैलेश चव्हाण, पॅथोलाॅजी विभाग प्रमुख डॉ. सुरेश चौरे, डॉ. दळवे, मेट्रन श्रीमती अमृता पोहरे, समाजसेवा अधिक्षक सुरेंद्र सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स आणि नर्सेस उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments