Latest News

6/recent/ticker-posts

बडे मियां,छोटे मियां ची कामगिरी औसा पालिकेत सरस

बडे मियां,छोटे मियां ची कामगिरी औसा पालिकेत सरस


 



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२१ - औसा नगरपालिकेत सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी प्रसिद्ध जावेद शेख व मुजाहिद शेख या दोन बंधूंची प्रसिद्धी सर्वत्र झाली आहे. या दोन बंधूंना बडे मियां छोटे मियां या नावाने लोक जाणतात.


या दोन बंधूंची निवड झाली त्या वेळेला घराणेशाहीचा आरोप यांच्यावर लागला होता. मात्र जे लोक हा आरोप करत होते, त्यांची मुस्कटदाबी झाल्याचे सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे .कारण ही तशाच पद्धतीचे आहे .या दोन बंधूंनी आपल्या कारकीर्दीत इतक्या सुंदर पद्धतीने काम हाताळले आहे की छोटे असो किंवा मोठे काम सर्वजण या दोन बंधूंकडे आपली समस्या मांडताना दिसत आहेत. हे दोन बंधू कोणी छोटा असो किंवा मोठा त्यांच्या अखत्यारीत असलेले काम जातीने लक्ष घालून ते पूर्णत्वास घेऊन जातात. नगराध्यक्ष काही दिवस रजेवर गेले असता नगराध्यक्ष पदाचा कारभार जावेद शेख यांच्याकडे दिला होता, या कालावधीत त्यांनी संपूर्ण शहरात विकास कामाचा धडाका लावला होता.म्हणजे नगराध्यक्ष पदावर असताना भरपूर कामे केली आणि नगरसेवक पदावर राहून ते कुणाचेही काम असो ते करण्यामध्ये पुढाकार घेतात,या दोघांची प्रसिद्ध यामुळे आहे कि कोणीही यांना फोन करून समस्या सांगितली तर लागलीच ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. काही नेतेमंडळी फोन न उचलल्यामुळे नागरिकांच्या डोक्यात बसले आहेत. मात्र हे दोन बंधू सर्वांचे फोन घेतात व काम करून दाखवतात. म्हणून हे सर्वांच्या हृदयात वसले आहेत.


   व्हाट्सअप फेसबुक च्या माध्यमातून अनेक लोकांनी मांडलेल्या समस्या देखील सोडवण्याचा प्रयत्न हे बंधु करतात. मुजाहिद शेख हे सध्या आरोग्य सभापती असल्याने त्यांचे काम खूप उल्लेखनीय आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी सनेटायजर ची फवारणी असेल, गटारी साफ करणे,प्रभागातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा नेहमी त्यांचा कटाक्ष असतो.


या दोघांची नगरपालिकेत सेवेची संधी उपलब्ध करून देऊन नगराध्यक्ष अफसर शेख यांनी काही चूक केली नाही असे निदर्शनास येत आहे.


Post a Comment

0 Comments