औसा नगर पालिकेने बेरोजगार संस्थेच्या अर्जाला दाखवली केराची टोपली
औसा:(तालुका प्रतिनिधी बी. जी. शेख)दि.१३ - औसा नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्चाची विकास कामे करण्यासाठी निविदा काढली होती या निविदेमध्ये बर्याच त्रुटी असल्याने येथील मजूर संस्था व बेरोजगार संस्थेने यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दिला होता या अर्जाची दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी मुख्याधिकारी यांना सूचना करून अहवाल मागवला होता या आहावालात नगरपालिकेने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निविदा खुली ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ येथील मजूर संस्था व बेरोजगार संस्था हे काम पूर्ण करू शकत नाही असे नगरपालिकेचे म्हणणे होते. शासकीय नियमांची पायमल्ली करून येथील नगरपालिकेने बेरोजगार संस्था व मजूर संस्था यांना डावलून मनमानी कारभार चालू केला आहे. ज्या संस्थेने हा अर्ज दिला होता त्यांनी "इशारा" प्रतिनिधीशी बोलताना असे म्हटले आहे की येथील संस्थेच्या "लोकांनी जगावे की मरावे." नगरपालिकेचे मात्र धोरण वेगळ्या पद्धतीचे दिसून येत आहे .'आपना काम बनता भाड मे जाये जनता 'या नीतिने येथील नेतेमंडळी व मुख्याधिकारी वागत असल्याची चर्चा जनतेतून ऐकायला मिळत आहे.
0 Comments