Latest News

6/recent/ticker-posts

03 वर्षीय बालकाच्या अपहरणाचा पर्दाफाश - आरोपी अटकेत, बालक सुखरूप आईच्या ताब्यात

03 वर्षीय बालकाच्या अपहरणाचा पर्दाफाश - आरोपी अटकेत, बालक सुखरूप आईच्या ताब्यात


लातूर : दि. ६ जून २०२५ - गुमस्ता कॉलनी, कव्हा रोड, लातूर येथून ३ वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. या प्रकरणाचा रहस्यभेद करत विवेकानंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक केली असून, बालक सुखरूप अवस्थेत सापडून त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटनेनंतर, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन.क्र. ३४६/२०२५ कलम १३७ (२) भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपास सपोनि शिनगारे यांनी केला, परंतु त्यांची बदली झाल्यामुळे पुढील तपास पोउपनि सचिन रेडेकर यांच्या हाती देण्यात आला.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक सक्रिय झाले. गोपनीय माहिती, तांत्रिक साधने आणि शास्त्रशुद्ध तपासपद्धतीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपी महेश रमाकांत सूर्यवंशी (रा. सिद्धेवर नगर, ता. औसा) याने अपहरणाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली तर बालकास पंढरपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुखरूप ताब्यात घेतले.बालकास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले असून, अपहरणामागील नेमका उद्देश स्पष्ट होणे बाकी आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन रेडेकर, मनिष आंधळे तसेच पथकातील पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, राणा देशमुख, संजय बेरळीकर, रमेश नामदास, सारंग लाव्हरे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे, दिपक बोंदर, संतोष देवडे, गणेश साठे व शैलेश सुडे यांनी पार पाडली.



Post a Comment

0 Comments